वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी एटीएमशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका व्यक्तीने स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने एटीएम मशीन छेडछाड केली असल्याचे उघडकीस आले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चिखली पोलीस(Chikhali) तपास करीत आहेत.