Chikhali : पोलीस असल्याचे भासवून एक लाखांची लाच स्वीकारताना दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- पोलीस असल्याचे भासवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लाच द्यायची असल्याचे सांगून एका इसमाकडून एक लाख रुपये घेणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. साने चौक चिखली येथील एका हॉटेलात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींकडून 32 हजार रुपये रोख आणि 71 हजार रुपयांचा बेअरर चेक जप्त करण्यात आला.

अमित रमेश मोहीते (24 रा. साने काॅलनी, मोरे वस्ती चिखली) व अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा (वय 28 वर्षे दगडू पाटील नगर, काळेवाडी, वाकड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात मोहननगर क्राइम युनिटमध्ये तक्रार दाखल असल्याचे सांगून ही केस मिटवण्यासाठी तक्रारदाराकडे आरोपींनी१ लाख ६ हजाराची लाच मागितली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.