Chikhali : भल्या पहाटे पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभा राहिलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे स्पाईन रोड, चिखली येथे घडली.

गणेश सत्यनारायण लगशेट्टी (वय 29, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश स्पाईन रोडवरील आदर्श हाऊसिंग सोसायटीजवळ रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.