Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री साडेसात वाजता घरकुल चिखली येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मन्नू कोरी, विकास उर्फ पांग्या जाधव, जय करसुळे, ज्यूनेत उर्फ आण्ण्या, मोन्या (पूर्ण नाव माहिती नाही), सोयल्या उर्फ चिप्स (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेखा बालाजी गायकवाड (वय 42, रा. घरकुल, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा मुलगा सुहास उर्फ पिल्या यांचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांची मुले सुहास आणि आकाश यांना दगडाने, लोखंडी सळई व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपींनी आकाशवर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांनी आरोपींना ढकलून दिले असता फिर्यादी यांच्यावर देखील कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. आरोपींनी आणखी दोन ते तीन लोकांना मारहाण केली आणि पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.