Chikhali : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -क्रिकेट मॅच खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथे घडली.

अक्षय संजय इंगळे (वय 25, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास उर्फ पांग्या जाधव (वय 20), वैभव कावळे (वय 20, दोघे रा. शरद नगर, चिखली), आनंद उर्फ दादा गवळी (वय 22, रा. ओटास्कीम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथील भारती सोसायटीसमोर असलेल्या रोडवर त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी मागील काही दिवसांपूर्वी क्रिकेट टूर्नामेंट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून अक्षय यांना मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी कोयत्याने मारले. यामध्ये अक्षय जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.