Chikhali : तलवारीने कापण्याची धमकी देत बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एकाला तलवारीने कापण्याची धमकी देत बॅटने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी चिखली येथे घडली.

सोनाली विनोद वाडकर (वय 25, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रंजीत दिवटीया याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरातील साफसफाईचे काम करत होत्या. त्यावेळी फ्लॅटच्या खाली राहत असलेले आरोपी रंजीत दिवटीया यांच्या पत्नीला फिर्यादी यांनी सांगितले की, ‘गॅलरी साफ करीत आहोत, तुम्ही तुमच्या गॅलरीतील कपडे काढून घ्या. नाहीतर पाणी पडेल.’ त्यावेळी आरोपी रणजीत गॅलरीत आला आणि फिर्यादी यांना मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली.

याबाबत फिर्यादी यांचे पती यांनी आरोपीला शिवीगाळ करण्याचा जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यातून आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला तलवारीने कापून टाकण्याची धमकी देत बॅटने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे पती गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.