Chikhali : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात महिलेला मारहाण

Beating a woman for a trivial reason

एमपीसी न्यूज – विनाकारण शिवीगाळ करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्यावरून महिलेला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता रुपीनगर तळवडे येथे घडली.

नताबाई सुखदेव व्हनमाने (वय 40, रा. सहयोग हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लिसांनी ज्योती संजय चव्हाण (वय 45, रा. सहयोग हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्हनमाने या मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांच्या घरासमोर दोरीवर वाळत घातलेले कपडे काढत होत्या. त्यावेळी आरोपी ज्योती फिर्यादी यांच्याकडे पाहून शिवीगाळ करत होत्या. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी महिलेला ‘तुम्ही शिवीगाळ का करता’ असे विचारले.

यावरून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेसोबत वाद घालून हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच घरासमोर पडलेला फरशीचा तुकडा फिर्यादी यांना मारून जखमी केले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.