Chikhali : घर सोडून जाणाऱ्या भावाला मारहाण

ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेदहा वाजता साने चौक, चिखली येथे घडली. : Beating brother for leaving home

एमपीसी न्यूज – घरगुती भांडणाच्या कारणावरून घर सोडून जाणाऱ्या भावाला सख्या भावाने आणि एका नातेवाईकाने मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेदहा वाजता साने चौक, चिखली येथे घडली.

सागर अंबादास शिंदे (वय 29, रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली. मूळ रा. जावळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुहास अंबादास शिंदे (वय 27), विष्णू मुळे (दोघे रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी सागर घरगुती भांडणाच्या कारणावरून बॅग घेऊन घर सोडून जात होते.

त्यावेळी आरोपी सुहास आणि विष्णू यांनी सागर यांना शिवीगाळ केली. तसेच विष्णू याने लोखंडी रॉडने सागर यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी सुहास याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.