Chikhali : मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देत वृद्धाला मारहाण

एमपीसी न्यूज – घरात घुसून चार जणांनी मिळून वृद्धाला आणि त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण केली. तसेच मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी जाधववाडी, चिखली (Chikhali) येथे घडली.

सुरेश मारुती दळवी (वय 65, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश जांभुळकर (रा.जाधववाडी, चिखली) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad Chowk : खड्डे चुकवताना ट्रक पलटी झाल्याने वाकड चौकात वाहतूक कोंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरात आले. तुम्ही माझ्या मुलीचं वाटोळं केलं आहे, असे बोलून आरोपी राजहंस याने फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना ढकलून देत लोखंडी सळईने डोक्यात मारले. त्यात फिर्यादी जखमी झाले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या मुलीला आणि जावयाला मारून टाकण्याची आरोपींनी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.