Chikhali : सतर्कतेमुळे हरवलेल्या मुलास शोधण्यास पोलिसांना यश

एमपीसी न्यूज – सतर्कतेमुळे हरवलेल्या दहा वर्षीय मुलाला शोधण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. काही तासांमध्ये पोलिसांनी मुलाला शोधून सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी (दि. 25) घडली.

आशिषकुमार अखिलेशकुमार सिंग (वय 10, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे हरवलेल्या मुलाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

आशिषकुमार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घरातून क्लाससाठी निघाला. ठराविक कालावधीनंतर तो क्लासवरून घरी येत असे. मात्र, सोमवारी दुपार टळली तरी आशिषकुमार घरी आला नाही. त्याच्या पालकांना काळजी वाटू लागली. त्यांनी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ पोलिसांना सूचना दिल्या. लांडेवाडी येथील टीम क्रमांक आठ आशिषकुमारचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की मोरेवस्ती चिखली येथे आशिषकुमार आहे. पोलिसांनी मोरेवस्ती येथून आशिषकुमारला ताब्यात घेत सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.