chikhali : कुदळवाडीत सोमवारी रक्तदान शिबीर -दिनेश यादव

Blood donation camp at Kudalwadi on Monday - Dinesh Yadav

एमपीसी न्यूज ; कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली, कुदळवाडी येथे सोमवारी (दि. 1 जून)
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘ फ ‘ प्रभागाचे  स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिली. 

सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5  या वेळेत महापालिका शाळेत हे शिबीर होणार आहे. आमदार श्री पै. महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या रक्तदान शिबिराचे करण्यात आले आहे.

या वेळी कुदळवाडी परिसरातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.