Chikhali : पार्किंगच्या कारणावरून झालेल्या भांडणात तोडली बरगडी; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. या भांडणात चौघांनी मिळून एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये जखमी व्यक्तीची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास देहू-मोशी रोडवर कुदळवाडी येथे घडली.

दिनेश लक्ष्मण घोडेकर (वय 40, रा. चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रमोद सोनी, त्याचा भाऊ व दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास देहू-मोशी रोडवर कुदळवाडी येथे शिवसागर फर्निचरसमोर टेम्पो पार्किंग करण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये भांडण झाले.

या भांडणात आरोपींनी दिनेश यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दिनेश यांच्या उजव्या डोळ्याला व डाव्या बरगडीवर इजा झाली. त्यांची डाव्या बाजूची एक बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.