BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : किरकोळ कारणावरून इसमाचा तोडला कान; एकावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – मावस भावाला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या इसमाला मारहाण करत त्याचा कान तोडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) त्रिवेणीनगर चिखली येथे रात्री सातच्या सुमारास घडली.

महेश सुभाष काटकर (वय 32, रा. त्रिवेणीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नवनाथ हरिभाऊ गायकवाड (रा. त्रिवेणीनगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ याने महेश यांचा मावस भाऊ अजय अशोक काटकर यांना शिवीगाळ केली. त्याबाबत विचारणा करण्यासाठी महेश त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर थांबले. या कारणावरून नवनाथ याने महेश यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत त्यांचा डावा कान तोडला. तसेच ‘तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.
.