Chikhali : घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Burglar arrested Five lakh items confiscated; घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज – घरफोड्या करून किंमती वस्तूंची चोरी करणाऱ्या पोलीसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्याला चिखली पोलीसांनी सोमवारी (दि.13) अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

अभय देवराय राऊत (वय.19, रा.पाटीलनगर, चिखली, मुळगाव मु.पो.गारड, ता.गुदखेड, जि.नांदेड ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनिल शिंदे व पोलीस शिपाई कबीर पिंजारी यांना आरोपी राऊत बाबत माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक व्हि. बी. बढे यांनी आरोपीस अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

चोरट्याने घरफोडीत चोरलेला तब्बल 5 लाख 33 हजार किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये 4 तोळे सोने, 400 ग्रॅम चांदी, 6लॅपटॉप, एक ऑटो रिक्षा व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, व पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, संभाजी कडलग,बाबा गर्जे, सुनिल शिंदे, सचिन गायकवाड, पितांबर गंबरे, रविंद्र काळे, चेतन सावंत, विश्वास नाणेकर, विपुल होले, कबीर पिंजारी, सचिन नलावडे, संतोष सपकाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like