Chikhali : घरफोडी करून सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराच्या दरवाजाचे लॅच लॉक तोडून चोरट्यांनी चोरी करत सोन्या-चांदीचे दोन लाख 33 हजार 500 रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी दीड ते सव्वादोनच्या दरम्यान चिखली येथे घडली.

सिद्धेश्वर रामलिंग कोरे (वय 40, रा. सेक्टर 16, राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर लॉक लावून बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील 8.5 तोळे सोने व चांदीचे दोन लाख 33 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.