Chikhali : सोसायटीच्या पार्किंगमधून कार चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत टॉवरलाईन रोड, मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

रामदास शंकर घाडगे (वय 61, रा. त्रिवेणीनगर, तळवडे रोड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाडगे यांच्याकडे तीन लाख रुपये किंमतीची एमएच 14 / जीएस 7658 ही कार आहे. त्यांनी त्यांची कार 27 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास टॉवरलाइन रोड, मोरेवस्ती येथील चेतन म्हेत्रे यांच्या श्रीराम हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार एक फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.