Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतो’ असे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील पूर्णानगर-आरटीओ रस्त्यावर घडली.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय वामन वावरे (रा. निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना आरोपी वावरे याने त्यांचा हात पकडला. तसेच ‘तुला किती पैसे पाहिजेत ते मी तुला देतो, तू मला खूप आवडतेस, तू खूप छान दिसतेस, माझ्यासोबत चल मी तुझे घर चालवतो’ असे बोलून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतरही आरोपीने महिलेचा लपून छपून पाठलाग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.