BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : मोरेवस्ती मधील साई मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज – मोरेवस्ती मधील साई कॉलनी येथे असलेल्या साई मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी दानपेटी, पितळी निरांजन आणि रोख रक्कम असा एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली.

दीपक कानिफनाथ गिरे (वय 33, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेवस्ती मधील साई कॉलनीमध्ये साई मंदिर आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी साई मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरात असलेली दोन हजार रुपये किमतीची दानपेटी, त्यातील रोख रक्कम आणि दोन पितळी निरंजन असा एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3