Chikhali : बनावट फेसबुक अकाउंटवरून अश्लील मेसेज पाठवणा-यास अटक
एमपीसी न्यूज – तरुणाचा फोटो आणि नावाचा वापर करून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरून अश्लील मेसेज पाठवले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नीरजकुमार सुरेशचंद कुमार (रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निलू राजकुमार जोठे (रा. मित्रवाडे पार्क, चिखली) या तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीरजकुमार याने फिर्यादी निलू यांचा फोटो आणि नाव वापरून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांच्या नावाने मेसेज केले. हा प्रकार 19 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी फिर्याद दिली असता चिखली पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 500, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.