Chikhali : जागेच्या वादातून इसमाला मारहाण

एमपीसी न्यूज- गाळ्याचे कुलूप तोडून परस्पर ताबा घेतलेल्या प्रकरणी झालेल्या मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना साने चौक, चिखली येथे घडली.

अतुल दयालसिंग चंदानी (वय 48, रा. भेळचौक, प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप रमेश पाटील आणि किशोर रमेश पाटील (रा. सानेचौक, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल यांचे वडील दयालसिंग (वय 86) हे गाळ्यातील प्लंबरिंगचे काम करण्यासाठी कामगारास घेऊन साने चौक येथील इमारतीच्या गाळ्यात आले. त्यावेळी त्यांना गाळ्याचे कुलूप तोडून त्याऐवजी दुसरे कुलूप लावलेले दिसून आले. यामुळे ते गाळ्याच्या मागील बाजूच्या दरवाजाकडे गेले असता तो उचकटलेला दिसून आला. या गाळ्यांमध्ये कपडे बांधलेली बंडल व कागदी बॉक्‍स दिसून आले. ते आत जाऊन बसले असता आरोपी संदीप हा हातात प्लास्टीक पाईप घेऊन आला. त्याच्यासोबत आरोपी किशोर हा देखील लोखंडी पाईप घेऊन आला. तुम्ही येथे का आलात, अशी विचारणा करीत दयालसिंग यांना बेदम मारहाण केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल आणि आरोपी पाटील यांच्यात गाळा विक्रीचा व्यवहार झाला. मात्र तो पूर्ण झालेला नसल्याने त्यांच्यात नेहमी भांडणे होतात. त्यातूनच हा प्रकार झालेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्‍याम म्हस्के याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like