Chikhali : …अन् काही तासासाठी चिखली रोड, साने चौकाने घेतला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज – आकुर्डी, चिखली रोड, साने चौकातील फुटपाथ ( Chikhali ) फेरीवाल्यांनी गिळंकृत केले असून पादचा-यांना चालणे मुश्किल होत आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रासाठी येणार होते. त्यामुळे पोलिसांनी फेरीवाल्यांना हटविले होते. त्यामुळे चिखली रोड, साने चौकाने काही काळ का असेना मोकळा श्वास घेतल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली.

Pimpri : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे महानगरपालिकेवर असहकार आंदोलनाचा इशारा

शहरातील अतिक्रमणे, अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर झाला आहे. चिखली, साने चौक हा भाग मोठा वर्दळीचा झाला आहे. त्यातच फुटपाथवर, रस्त्यांवर फेरीवाले, पथारीवाले, विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल होते. फुटपाथ गिळंकृत झाल्याने नागरिकांना सेवा रस्त्यांवरुन जीव मुठीत घेवून चालावे लागते. नागरिकांकडून सातत्याने अतिक्रमण  हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जाते. प्रशासनाकडून कारवाई केली जाते. पण, कारवाईच्या अर्धा तासानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी-चिंचवड शहर दौ-यावर होते. चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन त्यांचे हस्ते करण्यात आले. त्यांचा ताफा  आकुर्डी ,चिखली रोड, साने चौकमार्गे गेला. त्यामुळे सर्व अतिक्रमणे काढली होती. काही तासापुरता. का होईना या चौकांनी मोकळा श्वास घेतला. उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्त्वाची आहेच. त्यासोबत सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षित जीवन जगण्यासाठी उपयुक्त व्यवस्था असावी, अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांमधून ( Chikhali ) होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.