Chikhali : घरकुल येथे भारतीय संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – घरकुल येथे भारतीय संविधान दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी ‘भारतीय संविधान व आजचा भारत’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्वर राजन होते. पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी डॉ. प्राध्यापक राजाभाऊ भैलूमे यांनी भारतीय संविधान व भारतातील घडामोडी या विषयावर व्याख्यान दिले. संविधानात्मक प्रबोधन गायनाचा कार्यकम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास बेलसांगविकर यांनी केले, सम्यक क्रांती संघाचे अध्यक्ष दशरथ शिंदे यांनी आभार मानले.

घरकुल मधील सर्व सामाजिक संघटना, प्रतिष्ठान, मंडळे, महिला बचत गट व घरकुल मधील सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांनी उत्स्फूर्त सहभागी झाले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब चंदनशिवे, नरेंद्र महीरे, अनिल बनसोडे, वारूले, सुरेश आठवले, बबिता चक्र नारायण, मनीषा साळवे, तायडे व शिव नारायण यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.