Chikhali : कुदळवाडीत दूषित, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; दिनेश यादव यांचा आंदोलनाचा इशारा

Contaminated, muddy and smelly water supply in Kudalwadi; Dinesh Yadav warns of agitation : जुलाब, उलट्या, पोटदुखी असे आजार वाढले

एमपीसीन्यूज :  आठवड्यापासून चिखली, कुदळवाडी परिसरात दूषित पाणी येत आहे. त्यामुळे  नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या भागात जुलाब, उलट्या, पोटदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने या प्रश्नी तातडीने लक्ष देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि फ प्रभाग पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे कि आधीच करोनाने हैराण झालेल्या नागरिकांना आता दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. सध्या एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तोही दूषित, गढूळ व दुर्गंधी युक्त होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कुदळवाडी परिसरातील दूषित पाणीपुरवठा त्वरीत थांबवावा तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

दरम्यान, येत्या पंधरा दिवसात या भागातील दूषित पाणी पुरवठा बंद न झाल्यास महेशदादा लांडगे युवा मंचाच्या वतीने जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही यादव यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.