Chikhali: कोरोना योध्दा फौजदाराने लग्नावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला दिला एक लाखांचा निधी

Corona warrior faujdar avoids wedding expenses and donates Rs 1 lakh to CM assistance fund

एमपीसी न्यूज –  कोरोना योध्दा फौजदाराने अवघ्या दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करत विवाहातील अनावश्यक  खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांचा निधी दिला आहे. याबाबतचा धनादेश पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द  करण्यात आला. 

त्यांच्या या निर्णयाचे पोलीस दलात कौतूक करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक दत्ता साने उपस्थित होते.

चिखलीतील प्रविण साने सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून कार्यरत आहेत. साने आणि जुुुुन्नर, आर्वी येथील गाढवे कुटुंबातील मुलीचा  विवाह दि. 17 मे रोजी निश्चित झाला होता. मोठ्या धुमधडाक्यात विवाह करण्याचे त्यांनी निश्चित केले होते.

मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे देशासह महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दि. 17 मे रोजी अवघ्या 10 नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला.

दोन्ही परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साने आणि गाढवे परिवाराच्या सदस्यांनी शनिवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एक लाखांचा धनादेश सुपूर्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.