Chikhali : किरकोळ कारणावरून चुलतीला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून पुतण्याने चुलतीला दगडाने मारहाण केली. यामध्ये चुलती जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 10) पाटीलनगर, चिखली गाव येथे घडली आहे.

आशा रामभाऊ मोरे (वय 54 रा. पाटीलनगर, चिखली) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिरामण गुलाब मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांचा पुतण्या आरोपी हिरामण हा फिर्यादी यांच्या घराच्या भिंतीला लावलेले प्लास्टिकचे कागद हाताने ओढून काढत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला कागद का काढतोस असे विचारले.

याचा राग आल्याने हिरामण याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच दगड डोक्यात मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.