Chikhali Crime : चिखलीमधून 7 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

0

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे 7 लाख रुपयांचा 27 किलो 500 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 17) दुपारी सव्वाएक वाजता करण्यात आली आहे.

राहुल भीमराव पवार (वय 21, रा. ओटास्कीम, निगडी), अमोल अशोक शिंदे (वय 26, रा. अंकुश चौक, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रमोद जयराम लांडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली मधील सेक्टर क्रमांक 19 येथे सर्विस रोडच्या बाजूला एका झाडाखाली दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 7 लाख रुपयांचा 27 किलो 500 ग्राम गांजा आणी 90 हजारांची पल्सर दुचाकी असा एकूण 7 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले दोन्ही आरोपी गांजा विक्रीसाठी आले असल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.