Chikhali Crime : तळवडे येथे 68 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – तळवडे येथे अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी करून 68 हजार 700 रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून याबाबत 29 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

रामराव साहेबराव गिलबिले (वय 37, रा. अष्टविनायक हाऊसिंग सोसायटी, तळवडे. मूळ रा. आष्टा, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी यांच्या पत्नी त्यांच्या घराला कुलूप लाऊन पाहुण्यांच्या घरी झोपायला गेल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी गिलबिले यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 68 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. 26 सप्टेंबर रोजी सकाळी फिर्यादी यांच्या पत्नी घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.