Chikhali Crime: माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती गणेश हनुमंत कदम (वय 29), सासरे हनुमंत दत्तात्रय कदम (वय 55), सासू जयश्री हनुमंत कदम (वय 50), नणंद प्रीती हनुमंत कदम (वय 27, सर्व रा. साने चौक, मोरेवस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार डिसेंबर 2019 पासून 26 मे 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व हाताने मारहाण केली. माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. तसेच वाईट वागणूक देऊन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.