Chikhali Crime : विवाहितेचा मानसिक छळ; सासरच्या आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘तू मला आवडत नाही. मी तुझ्यासोबत फॉर्मलीटी म्हणून जगतो.’ असे म्हणत पतीने विवाहितेचा छळ केला. तसेच कौटुंबिक कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास दिला. याबाबत सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर 2018 पासून 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत हडपसर, पुणे आणि शाहूनगर, चिंचवड येथे घडला आहे.

पती गणेश सुळे, सासू मंगल सुळे, नणंद रोहिणी नंदकुमार चोपडे, नंदावा नंदकुमार चोपडे, चुलत सासरे शेखर सुळे, चुलत सासू सुनिता सुळे, पतीचे मामा विठ्ठल अर्जुन, पतीची मामी कविता विठ्ठल अर्जुन (सर्व रा. हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडीत विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता सासरी नांदत असताना आरोपी पतीने ‘तू मला आवडत नाही. तुझ्याबरोबर लग्न करून माझी हौस फिटली. मी पाप केले म्हणून तू मला भेटली. मी तुझ्याबरोबर फॉर्मलीटी म्हणून जगतो. एंटरटेन करणारी भरपूर माझ्या बहिणीच्या सोसायटीत आहेत.’ असे म्हणून तिचा मानसिक छळ केला.

प्रसूती झाल्यानंतर त्याने पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपी पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. अन्य आरोपींनी विवाहितेला स्वयंपाक येत नाही. लग्नामध्ये माहेरच्या लोकांनी वस्तू दिल्या नाहीत. माहेरचे लोक चांगले नाहीत, असे म्हणून वेळोवेळी सोन्याचे दागिने व घरातील वस्तूंची मागणी केली. त्यावरून आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.