Chikhali Crime News: चिखलीतील कंपनीमधून 13 कॉपरच्या पट्ट्या चोरीला

एमपीसी न्यूज – चिखलीतील कंपनीमधून चोरट्यांनी 72 हजार रुपये किंमतीच्या 13 कॉपरच्या पट्ट्या चोरून (Chikhali Crime News) नेल्या आहेत. ही चोरी 22 सप्टेंबर रोजी रात्री आट ते शुक्रवारी 23 सप्टेंबर सकाळी आट या कालावधीत झाली आहे.

याप्रकरणी राजेंद्र मुरलीधर काळे (वय 60 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल केला आहे.

Chinchwad : चिंचवडच्या भाजी मंडईतून ज्येष्ठ नागरिकांचे दोन आयफोन चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या उघड्या खिडकीवाटे आच प्रवेश करून कंपनीच्या 72 हजार 117 रुपये किंमतीच्या 13 कॉपर प्लेट चोरून (Chikhali Crime News) नेल्या आहेत. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.