Chikhali crime News : दारू पित बसलेल्या दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बंद टपरीसमोर दारू पित बसलेल्या दोघांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे साडेबारा वाजता सोनीगरा मैदान, रुपीनगर, तळवडे येथे घडली.

विकास अनिल शिंदे (वय 32, रा. यमुनानगर, निगडी) आणि दिगंबर मधुकर मानकरी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी विकास शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोहसीन युसुफ तांबोळी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे) आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे दोन मित्र सोनीगरा मैदान, रुपीनगर- तळवडे येथील एका बंद टपरीसमोर बुधवारी पहाटे दारू पित बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले.

आरोपी मोहसीन फिर्यादी यांना ‘ए बाळा’ असे म्हणाला. त्यावरून फिर्यादी यांनी त्याला समजावले की, ‘नीट बोल, मी तुझ्या वयाचा नाही. आम्ही दारू पित आहे. तू जा.’

यावरून रागावलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र दिगंबर याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. मोहसीन याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या डोक्यात सिमेंटच्या पत्र्याने मारून गंभीर दुखापत केली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.