Chikhali crime News : रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी महिलेवर नातेवाईकाकडून कुऱ्हाडीने वार

सिंधू मोहिते असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.

एमपीसी न्यूज – रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी महिलेवर तिच्या नातेवाईकाने घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना आज (गुरुवारी, दि. 27) चिखली परिसरात घडली.

सिंधू मोहिते असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू या रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहे. सिंधू यांच्या मोठ्या बहिणीला तिचा पती वारंवार मारहाण करत होता.

त्यामुळे सिंधू यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या बहिणीला माहेरी पाठवले होते. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यावरून बहिणीच्या आरोपी पतीने सिंधू यांच्या घरी येऊन त्यांच्यावर कुऱ्हाडीने तीन वार केले. यामध्ये सिंधू गंभीर जखमी झाल्या.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.