Chikhali Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिला घराबाहेर काढून मारहाण केली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 ऑगस्ट 2019 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत चिखली येथील घरकुल आणि पाटीलनगर येथे घडला.

किरण गोरख शिंदे (वय 27), आशा गोरख शिंदे (वय 45), गोरख महादू शिंदे (वय 55), अर्चना गोरख शिंदे (वय 28, सर्व रा. पाटीलनगर, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित विवाहितेला घरगुती कारणांवरून घरातून बाहेर काढले. तिला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच तिला वाईट वागणूक दिली. तिचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.