Chikhali crime News : विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवाविरोधात गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शासनाची परवानगी न घेता विविध कोर्सेससाठी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जननदीपा / ज्ञानदीपा विद्यापीठ रामवाडी, पुणे या संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे.

डॉ. अभिषेक सुभाष हरिदास (वय 38, रा. राहुलनगर जवळ, कर्वे पुतळा, कोथरूड) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. अभिषेक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी जननदीपा / ज्ञानदीपा विद्यापीठ रामवाडी पुणे या संस्थेत पीएच.डी. (फिलॉसॉफी) साठी jdv.edu.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरला.

त्यानंतर जननदीपा / ज्ञानदीपा विद्यापीठ या संस्थेने अधिकृत शासनाची परवानगी न घेता वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली.

चिखली येथील हमारा विश्व फाउंडेशन संस्थेच्या कार्यालयात हा प्रकार उघडकीस आल्याने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

त्यानुसार जननदीपा / ज्ञानदीपा विद्यापीठ या संस्थेच्या सचिव आणि अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.