Chikhali Crime News : लिलाव भिशीच्या नावाखाली 19 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लिलाव भिशी लावण्याच्या बहाण्याने सभासद करून घेऊन भिशीचे पैसे घेऊन तब्बल 19 लाख 43 हजार 23 रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडला.

रफिक इसाक तांबोळी (मूळ रा. चंगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी अजिनाथ कापसे (वय 42, रा. चिखली) यांनी गुरुवारी (दि. 23) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मोरेवस्ती चिखली येथे राहत होता. त्यावेळी तो वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रकमेच्या लिलाव भिशी चालवत होता. त्याने फिर्यादी आणि अन्य काही लोकांना लिलाव भिशीसाठी सभासद करून घेतले. त्यांच्याकडून दर महा भिशीच्या रकमा स्वीकारल्या. त्यानंतर सभासदांना पैसे न देता त्यांची तब्बल 19 लाख 43 हजार 23 रुपयांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.