Chikhali Crime News : फ्लॅट व दुकान घेण्यासाठी 10 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – फ्लॅट व दुकान घेण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे 10 लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. त्यासाठी तिचा छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पती इरफान नवाब शेख (वय 25), सासू रेहाना नवाब शेख (वय 45), दीर शहेबाज नवाब शेख (वय 23), पतीचे मामा नवशाद शेख (वय 40, सर्व रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 26 नोव्हेंबर 2019 पासून 20 डिसेंबर 2020 या कालावधीत कोंढवा बुद्रुक, पुणे आणि चिखली येथे घडला आहे. आरोपी पती इरफान याने ‘तू मला आवडत नाही’ असे म्हणत विवाहितेला मानसिक त्रास दिला. तसेच अन्य आरोपींनी विवाहितेकडे फ्लॅट आणि दुकान घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला उपाशी ठेऊन शिवीगाळ करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारून शारीरिक व मानसिक छळ केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.