Chikhali Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – ‘तू माझ्याशी मैत्री केली नाहीस. मला भेटायला आलाय नाहीस, तर तुझे फोटो व्हायरल करिन’, अशी धमकी देत एकाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना ऑक्टोबर 2020 ते 1 मार्च 2021 या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडली.

अमोल भिवसेन वैराळ (रा. वाघोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींने फिर्यादी महिलेला वारंवार फोन करून ‘मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. मला तुला भेटायचे आहे. तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत’, असे म्हटले.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर महिलेने आरोपीला नकार दिला असता त्याने ‘तू जर माझ्याशी मैत्री केली नाहीस. तू मला भेटायला आली नाहीस, तर तुझे माझ्याकडे असलेले फोटो व्हायरल करीन’ अशी धमकी दिली.

मात्र, पीडित महिलेने आरोपीचा फोन उचलला नाही. त्यानंतर आरोपीने महिलेच्या व्हाट्सअपवर मेसेज करून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.