Chikhali Crime News : घरात घुसून महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – घरात घुसून झटापट करीत महिलेच्या अंगावरील साडेअकरा ग्रॅमचे दागिने चोरट्याने हिसकावले. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे 31 मार्च रोजी घडली.

नंदकुमार कोहळे (रा. स्वप्ननगरी कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरती भागवत शिंदे (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी रविवारी (दि. 4) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी नंदकुमार हा फिर्यादी यांच्या घरी तोंडाला रंग आणि मास्क लावून आला. फिर्यादी यांचा कामगार यास “तू का तुझ्याकडे घेतलीस?’ असे म्हणत फिर्यादी आरती यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर हाताने मारून तोंडात बोट घालून आतमध्ये नखाने ओरखडले. किचनमधील पातेले आरती यांच्या डोक्‍यात मारले. त्यानंतर लोखंडी कपाटाला आपटून फिर्यादी यांचे दोन्ही हात धरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बदाम व कानातील टॉप्स असे 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले.

पोलीस उपनिरीक्षक कुमठकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.