Chikhali Crime News : कंपनीचे पत्रे उचकटून पावणे तीन लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – कंपनी आणि ऑफिसचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दोन लाख 78 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

राजेश शांतीनाथ जैन (वय 50, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याबाबत सोमवारी (दि. 1) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांची सोनवणे वस्ती, चिखली येथे राज फासनर्स नावाची कंपनी आहे. 24 फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ या कालावधीत चोरट्यांनी जैन यांच्या कंपनीचे आणि ऑफिसचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला.

त्यानंतर कंपनीतील 16 एम एस वायर बंडल, एक डेल कंपनीचा लॅपटॉप, एक लॅपटॉप बॅग, चार्जर, सोनी कंपनीचा टीव्ही, सिम्फनी कंपनीचा एअर कुलर, हिक व्हिजन कंपनीचा आठ सीए डीव्हीआर, हार्ड डिस्क, एचडीडी टीव्ही, 100 किलो नट बोल्ट, असा एकूण दोन लाख 78 हजार रुपये किमतीचा माल चरून नेला.

जैन यांनी याबाबत दोन दिवसानंतर फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.