Chikhali Crime News : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती पद्माकर रमाकांत कुलकर्णी, सासरे रमाकांत रंगनाथराव कुलकर्णी, सासू शांताबाई रमाकांत कुलकर्णी (तिघे रा. जाधववाडी, चिखली), नणंद मीरा महेश देशमुख, नंदावा महेश देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 19) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 29 एप्रिल 2008 पासून 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे घडला. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच मुलगा होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली.

लग्नात मानपान, आहेर केला नाही. सोने, दागिने दिले नाहीत या कारणांवरून अपमान करून विवाहीतेकडे घटस्फोटाची मागणी केली. ‘तू मला घटस्फोट दे, हे घर लवकर सोड, हे घर विकायचे आहे. नाहीतर तुला जिवंत जाळेन. तुला मारल्यावर मला सोडवण्यासाठी माझे दाजी कोर्टात आहेत’ अशी धमकी देऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.