Chikhali Crime News : मुलबाळ झाले नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मुलबाळ होत नाही. तसेच माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून पती आणि सासऱ्याने विवाहितेचा छळ केला. ही घटना चिखली परिसरात घडली.

याबाबत पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 40 वर्षीय पती आणि 60 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 9 ऑगस्ट 2003 पासून 2 डिसेंबर 2020 या कालावधीत घडली. लग्नानंतर दोन वर्ष फिर्यादी यांना मुलबाळ झाले नाही. यावरून आरोपींनी विवाहितेला त्रास दिला. घराचे काम करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. पैसे न आणल्यास तुला नांदवणार नाही, अशी धमकी दिली.

विवाहितेने माहेरहून कमी पैसे आणले. त्यावरून देखील आरोपींनी विवाहितेचा छळ केला. आरोपी सासरा विवाहितेकडे वाईट भावनेने पाहत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.