Chikhali Crime News : ‘तुझा संसार मोडतो’ अशी धमकी देत पतीच्या मित्राकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – ‘तुझा संसार मोडतो’ असे म्हणत पतीच्या मित्रानेच विवाहित महिलेचा विनयभंग केला. ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान मोरेवस्ती, चिखली येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित महिलेनं शुक्रवारी (दि.02) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश विश्वनाथ कदम (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपी फिर्यादी महिलेचा पती घरी नसताना घरी जाऊन चहा, नाष्टा यांच्या निमित्ताने महिलेला स्पर्श करायचा.

तसेच, ‘तुला माझ्याशी बोलू वाटत नाही का ? तुझ्या आणि माझ्यात जे सुरू आहे ते तुझ्या पतीला सांगून, तुझा संसार मोडतो’ अशी धमकी दिली.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.