Chikhali Crime News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.

ओंकार रवींद्र गुंजाळ (वय 25, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल येथे पिरबाबा दर्ग्याजवळ एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आहे, अशी माहिती पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घरकुल येथे सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच ओंकार पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त केली. ओंकार याने मागील तीन महिन्यांपूर्वी हे पिस्टल आरोपी सलीम याच्याकडून खरेदी केले होते. सलीमवर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असून तो एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.