Chikhali Crime News : विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) दुपारी कुदळवाडी येथे करण्यात आली.

लालमनी सुखदेव विश्वकर्मा (वय 42, रा. कुदळवाडी, पुणे. मूळ रा. दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जिलाणी मुसा मोमीन यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गांजा विक्रीसाठी कुदळवाडी बालघरे वस्ती येथे आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी 16 हजार 300 रुपये किमतीचा 652 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. आरोपीने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.