Chikhali Crime News : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी

फोन करुन तसेच पाठलाग करुन तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा पाठलाग केला. तसेच तिला फोन करून त्रास दिला. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्यासोबत लग्न कार्याचे आहे. तू माझ्या सोबत लग्न केले नाही तर मी तुला ठार मारील आणि मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली. याबाबत एका तरुणाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ अंकुशराव गोरे (रा. गुलमोहर सोसायटी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला फोन केला. तिला समक्ष भेटून तिचा पाठलाग केला. तरुणीच्या घराजवळ तसेच बालघरे वस्ती, कुदळवाडी येथे आरोपीने ‘ मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू माझ्या सोबत लग्न केले नाही तर मी तुला ठार मारील आणि मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली. याबाबत हरिभाऊ गोरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.