Chikhali crime News : साने चौकातील व्हिडिओ गेम पार्लरवर छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – साने चौक, चिखलीमधील कृष्णा कॉम्प्लेक्स येथील ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगारावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी तीन लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बालाजी व्हिडिओ गेम पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटरचे चालक मालक पियुष धर्मेंद्र राय (वय 22, रा. केशवनगर, चिखली. मूळ रा. बिहार), सुखकर्ता व्हिडीओ पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटरमधील चालक कामगार अक्षय ज्ञानदेव माने (वय 21, रा. अजिंठानगर, निगडी), राजश्री व्हिडीओ गेम पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटर चालक कामगार शशांक अनिल केशरवाणी (वय 29, रा. यमुनानगर, निगडी) आणि अन्य 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साने चौक, चिखली मधील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या सुखकर्ता, राजश्री आणि बालाजी ऑनलाईन व्हिडीओ गेम अँड लॉटरी सेंटरवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला.

त्यात पोलिसांनी 53 हजार 520 रुपये रोख रक्कम, एक लाख 56 हजारांचे व्हिडीओ गेम खेळण्याचे बॉक्स, 100 रुपयांचे जुगार साहित्य, 33 हजार 400 रुपयांचे एलईडी व इतर साहित्य आणि 72 हजार 800 रुपयांचे 10 मोबाईल फोन असा एकूण तीन लाख 15 हजार 820 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.