Chikhali Crime News : आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलेला कामाला लावण्याचे आमिष दाखवून बलात्कार

एमपीसी न्यूज – आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलेला कामाला लावण्याचे आमिष दाखवले. तिची सर्व सोय करण्याचे सांगत तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मार्च 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली आहे.

जनार्धन धुळगुंडे (रा. तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने 31 मार्च 2021 रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आर्थिक अडचणीत असल्याचे आरोपीला माहिती होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार फोन करून कामाला लावण्याचे आमिष दाखवले. तसेच त्याने स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देऊन फिर्यादी महिलेची सर्व सोया करतो, असे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी महिलेला कामाला लावण्याच्या बहाण्याने तिला बाहेर बोलावून त्याच्या कारमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर देखील तिचे शारीरिक शोषण करण्याच्या उद्देशाने आरोपीने फिर्यादी महिलेला त्रास दिला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.