Chikhali Crime News : रावण टोळीचा सदस्य, ‘मोक्का’तील फरार आरोपी जेरबंद

गुंडा विरोधी पथकाने वारजे परिसरात ठोकल्या बेड्या

0

एमपीसी न्यूज – रावण टोळीचा सदस्य आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने वारजे परिसरातून अटक केली. अटक केलेल्या आरोपीवर खून, दरोडा आणि मारहाणीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

रुपेश प्रकाश आखाडे (वय 24, रा. शिवणे, वारजे, पुणे. मूळ रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आखाडे आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून मार्च 2020 मध्ये एका बेकरी चालकाला मारहाण करून लुटले होते. बर्गर खाल्ल्यानंतर बेकरी चालकाने पैसे मगितल्यावरून हा वाद झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये रुपेश आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. रुपेशवर खुनाचा देखील गुन्हा दाखल आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. त्यामध्ये तो पोलिसांना चकवा देऊन पळत होता. गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून त्याला ट्रॅक केले आणि शिवणे, वारजे येथून अटक केली.

गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम, तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment