Chikhali crime News : धक्कादायक ! संशयातून पती आणि दिराने विवाहितेची केस कापले

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्यावर संशय घेऊन पती आणि दिराने विवाहितेचे केस कापले. हा प्रकार घरकुल, चिखली आणि पडळवस्ती, खडकी येथे घडला.

पती शैलेश सुभाष कांबळे आणि मंगेश सुभाष कांबळे (सध्या रा. खडकी. तसेच विघ्नहर्ता हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना नोव्हेंबर 2000 ते 2018 या कालावधीत घरकुल आणि खडकी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि दीर फिर्यादी यांच्यावर वेळोवेळी संशय घेत असे. तसेच विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करीत उपाशीही ठेवत असे. तसेच त्यांनी विवाहितेचे केस कापून तिला मानसिक व शाररीक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून माहेराहून पैसे व दागिने न आणल्याने तिला नांदविण्यास नकार दिला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III