Chikhali Crime News : कृष्णानगरमध्ये सहा लाखांची घरफोडी ; सुरक्षारक्षकावर संशय

एमपीसी न्यूज – दरवाजाचे लॅचलॉक तोडून सहा लाखांची घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरक्षारक्षकानेच ही घरफोडी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णानगर- चिंचवड याठिकाणी 23 ते 27 मे दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी रमेश बबुराम चव्हाण (वय 54, रा. साईचंद्र इन्क्लेव्ह, कृष्णानगर, चिंचवड ) यांनी शुक्रवारी (दि.28) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरक्षारक्षक आयुष याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून चोरट्याने 5 लाख 90 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रुद्राक्ष माळा व विविध स्टोन्स चोरी केले. सुरक्षारक्षकानेच ही घरफोडी केल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.